Authored by रमेश खोकराळे | Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Feb 25, 2022, 1:04 PM
नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आजच प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता न्यायालय नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणार का, हे पाहावे लागेल. संजय राऊत यांनी शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेत “बाप बेटे जेल जाएंगे”, असा इशारा दिला होता.

उद्धव ठाकरे आणि नील सोमय्या
हायलाइट्स:
- पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक
- पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचेही राऊत यांनी म्हटले होते
संजय राऊतांनी काय आरोप केले होते?
निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्या यांची आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आहे. त्यांचा मुलगा नील किरीट सोमय्या यांची आहे, जो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी मौजे गोखीवरे ता. वसई येथे उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल केलं. वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन फ्रंटमॅन आहे लाढानी म्हणून त्याच्या नावावर घेतली तसंच कॅशही घेतली. ती ८० ते १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. गोखीवरे वसई येथे ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त साडे चार कोटी रुपयांना घेतली. आणखी एक जमीन घेतली आहे, ती सात कोटी रुपयांची आहे आणि त्याच जमीनीवर कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या निकॉन फेज १, निकॉन फेज २ उभारले जात आहेत.
या प्रकल्पात Enviroment Cleareance नाही. अनेक नियमांची पायमल्ली केली गेली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने जर दखल घेतली तर २०० कोटी रुपयांचा दंड होईल. माझं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे, की ताबडतोब यात लक्ष घाला. या प्रोजेक्टचे सर्व परवाने रद्द करा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : kirit somaiya son neil somaiya seeks anticipatory bail plea in sessions court after shiv sena sanjay raut accusations
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network