तीन ते चार तास उलटूनही नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. | Nawab Malik ED

 

Nawab Malik

नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

हायलाइट्स:

  • नवाब मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती
  • नवाब मलिक हे चौकशीदरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात
मुंबई: कुख्यात गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नवाब मलिक यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. परंतु, नवाब मलिक यांना नेमका कसला त्रास होत आहे, हे कळू शकलेले नाही. न्यायालयाने यापूर्वीच नवाब मलिक यांना ईडी कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करुन देण्यास परवानगी दिली होती. (Nawab Malik admitted to J J hospital in Mumbai)
नवाब मलिक यांना ईडी कोठडीतील कालावधीत घरचे जेवण, औषधांसाठी परवानगी
दरम्यान, नवाब मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक हे चौकशीदरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते प्रश्नांची उत्तर देण्यात टाळाटाळ करतात, अशी ईडी अधिकाऱ्यांची तक्रार असल्याचे समजते.

भंगारवाला ते संजय गांधींचा खास नेता; मलिक पवारांपर्यंत कसे पोहोचले?

पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यामुळे ३ मार्चपर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात असतील. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती ईडीच्या गोटातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता ईडी ३ मार्चला नवाब मलिक यांच्या कोठडीचा कालावधी आणखी वाढवून मागणार का, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp leader nawab malik health deteriorated ed officers admitted him to j j hospital in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here