औरंगाबाद : नवाब मालिकांची ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर आज औरंगाबाद महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी आंदोलनात शिवसेनेचे मोजके नेते आणि पदाधिकारी सोडले तर इतर कार्यकर्त्यांनी मात्र आंदोलनातून कल्टी मारल्याचं पाहायला मिळालं. पण माध्यमांनी लक्ष वेधताच तात्काळ शिवसेनेचे रुमाल आणून कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालून, सावरासावर करण्यात आली.
…अन् तात्काळ उपरणे मागवले
धरणे आंदोलनात राष्ट्रवादी- काँग्रेसचेच झेंडे आणि उपरणे दिसत असल्याने शिवसेना आंदोलनात सहभागी नाही का ? असा मुद्दा माध्यमांनी उपस्थितीत करताच शिवसेना नेत्यांनी तात्काळ शिवसेनेचे उपरणे मागवून घेतले. पण झेंडे काही मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेचा सावरासावरीची चर्चा आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे.