मुंबई: करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभर पुकारण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल रोजी संपत असला तरी महाराष्ट्रात हा कालावधी काही आठवड्यांनी वाढवला जाऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्री यांनी शुक्रवारी दिले. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांच्या बाबतीत तसा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विशेषत: मुंबईत पूर्ण काळजी घेतली जात आहे. मुंबईत करोनाचा संसर्ग रोखणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. महापालिका, पोलीस व आरोग्य विभागाच्या टीम त्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जवळपास १५० परिसर सील करण्यात आले आहेत. संशयितांना ओळखण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहेत,’ असं टोपे म्हणाले. ‘सध्याच्या लॉकडाऊनमुळं हळूहळू संसर्गाचं प्रमाण आणि रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. मात्र, आजघडीला तरी आकडा वाढताना दिततोय. त्यामुळं लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. अर्थात, हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लगेचच लॉकडाऊन मागे घेतला जाऊ नये, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं टोपे म्हणाले. एका न्यूज वेबसाइटशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊनच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. याबाबत परिस्थिती पाहून राज्यांनी आपापल्या पातळीवर निर्णय घ्यावा, अशी सूचना मोदींनी केली होती. मात्र, सर्व निर्बंध एकदम उठवल्यास आतापर्यंतच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाऊ शकते, असंही ज्येष्ठ नेत्यांचं व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.

वाचा:

दरम्यान, राज्यात शुक्रवारी ६७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्यानं आतापर्यंत करोना रुग्णांचा आकडा ४९० वर पोहोचला आहे. तर, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here