हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव ते वाढवणा शिवारात एका शेतातील विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटना ही आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली तर पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मृतदेह विहरी बाहेर काढून कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पानकनेरगाव या गावातील एक इसम हरवल्याची तक्रार पोलिस स्थानकात प्राप्त झाली आहे. ओळख पटल्यानंतर तो इसम कोण हे निष्पन्न होईल. तर परिसरात गुप्तधनाच्या माध्यमातून खून झाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नसून पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.