नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर करण्यात येत असलेल्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला पाटील, जिल्हाध्यक्षा वैशाली चौधरी, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.
पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीबाबत शिवसेनेनं काय स्पष्टीकरण दिलं?
आंदोलनाबाबत पालकमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. तसंच ते शासकीय कार्यक्रमांना बैठकांना हजर असल्याने येऊ शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.
दरम्यान, ईडी हे शास्त्र असून भाजप म्हणजेच मोदी सरकार त्याचा शस्त्राप्रमाणे वापर करत आहे, हे चुकीचं आहे, आम्ही नवाब मलिक यांना चांगले ओळखतो ते कोणतंही चुकीचं काम करू शकणार नाहीत, अशी शब्दांत अरुणभाई गुजराथी यांनी नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे.