औरंगाबाद : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले आजपासून ( २६ फेब्रुवारी ) आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध मराठा संघटना आणि तरुणांचा पाठिंबा मिळत असून, हजारो तरुण मुंबईत दाखल होणार आहे. तर संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातून ५ हजार तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शहरातही अन्नत्याग आंदोलन…
संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईत जाणार आहे. मात्र, ज्यांना मुंबईत जाणे शक्य नाही ते औरंगाबादच्या क्रांती चौकात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यात असेच अन्नत्याग आंदोलन करून संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.