औरंगाबाद : राज्यात रोज म्हटलं तरी महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आताची महिला बाहेर तर सोडाच पण घरातही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. अखेर यामध्ये नराधमाला कठोर शिक्षा झाल्याने जिल्ह्यात समाधानाचं वातावरण आहे.

पत्नीला न जुमानता स्वत:च्या १७ वर्षीय मुलीचा सातत्याने लैंगिक छळ करणाऱ्या तसेच पत्नी व मुलांना शिविगाळ-मारहाण करणाऱ्या पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांन्वये साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे यांनी गुरुवारी ठोठावली.

संभाजीराजेंचं आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन; ५ हजार तरुण मुंबईकडे रवाना
या प्रकरणात पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही दोन जुळी मुले व मजुरीकाम करणाऱ्या आरोपी पतीसह राहात होती. फिर्यादीला अर्धांगवायुचा त्रास असल्याने तिला लवकर उठता-बसता येत नाही. या असाह्यतेचा गैरफायदा घेत तिचा मद्यपी पती हा रात्री स्वत:च्या मुलीचा लैंगिक छळ करीत होता. त्यावरुन पती-पत्नीत नेहमी वाद होत होते; परंतु पत्नी व मुलीला न जुमानता तो सातत्याने तिचा विनयभंग करीत होता. चार व पाच सप्टेंबर २०२० रोजी आरोपीने असाच प्रकार केल्यानंतर पत्नीने तक्रार दिल्यावरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी सात साक्षीतदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत, त्याला भारतीय दंड संहितेच्या ३५४ कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, ‘पोक्सो’च्या ७ व ८ कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, ‘पोक्सो’च्या ९ व १० कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, तर ‘पोक्सो’च्या कलम ११ व १२ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोषीला १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मनसेचा १६वा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर होणार, राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here