रत्नागिरी: रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळं महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये वास्तव्यास असणारे शेकडो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी तेथे अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आठ विद्यार्थीही तिथे अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी पालकांनी सरकारला विनंती केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या मुलांना मायदेशी आणावं, असं त्यांचं म्हणणं आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियन सैन्यानं धडक दिली आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले होत असताना, महाराष्ट्रासह अवघ्या भारताची चिंता वाढली आहे. कारण, युक्रेनमध्ये शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थीही त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यातील देवरुख येथील अद्वैत कदम आणि मंडणगडमधील आकाश कोबनाक हे देखील आहेत. अद्वैत हा एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तर मंडणगड येथील आकाश कोबनाक एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. युक्रेनमधील परिस्थिती सध्या भयानक असल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. आमच्या मुलांना मायदेशी आणा, अशी आर्त विनवणी ते करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या मुलांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; जिल्हा प्रशासनाने…

काही करून मुलांना परत आणा; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सरकारला आर्त साद

अद्वैतचे वडील विनोद कदम यांनी सांगितले की, ”अद्वैत १० डिसेंबरला युक्रेनमध्ये गेला. वैद्यकीय शिक्षण घेत आहे. खरंतर, युक्रेन आणि रशियात युद्ध होईल अशी शक्यता असतानाच, मुलाच्या परतीची विमानाची तिकीटं काढली होती. ५ आणि ६ मार्च रोजीची तिकीटं काढण्यात आली होती. पण त्याआधीच युद्ध सुरू झालं. त्यामुळे माझ्या मुलासह अनेक भारतीय विद्यार्थी तिथं अडकले आहेत. सध्याची भयंकर परिस्थिती बघता मुलं तणावात आहेत. अशा परिस्थितीत मुलांना तेथून बाहेर काढावं आणि मायदेशी घेऊन यावे, अशी आमची सरकारला विनंती आहे.” भारत सरकारकडून आमच्या प्रशासनाशी संपर्क केला जात आहे. सध्या काही भागांत गंभीर परिस्थिती आहे. तिथे अडकलेल्यांना आधी बाहेर काढणार असं आम्हाला कळतं. बेसमेंटमध्ये असल्याने बाहेर सध्या काय चाललं आहे, नेमकं काही सांगता येत नाही, असं युक्रेनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने सांगितले. तर आकाशचे वडील अनंत कोबनाक यांनी सांगितले की, ‘आकाश हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याच्या परतीची तिकीटं आधीच काढली होती. पहिल्या दिवशी त्याला काहीही भीती वाटली नाही, पण आता ज्या ठिकाणी राहतो, तेथे परिसरात रशियाकडून हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळं भीती वाढली आहे. युद्धजन्य परिस्थितीत आमच्या मुलांनी तिथं राहणं धोकादायक आहे. माझ्या मुलासह सर्वच भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं प्रयत्न करावेत अशी विनंती करतो.’

नाशिकचे दोन विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये; पालकांच्या जीवाची घालमेल
Russia-Ukraine war: चिंता वाढली; युक्रेनमध्ये अडकले रत्नागिरीतील आठ विद्यार्थी

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here