उस्मानाबाद : काल रात्री उस्मानाबाद येथील गणेशनगर येथे राहणाऱ्या हणमंत चंद्रकांत अकोसकर या एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी विषारी औषध घेवून आपला शेवट केला. कोर्टाने पुढील तारीख दिल्याने नैराश्यातून काल रात्री विषारी औषध घेवून हणमंत अकोसकर यांनी आपले जीवन संपवले. ही बातमी समजताच संपावरील कर्मचारी एकत्र आले. मयत हणमंत अकोसकर यांचा मृतदेह उस्मानाबाद आगारात आणून ठेवला आहे. न्याय करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हणमंत अकोसकर हे वाहक म्हणून तुळजापुर येथील आगारात कार्यरत होते. एसटीचे शासनात विलिनीकरण करा, या मागणीसाठी ११६ दिवसापासून संप चालू आहे. या संपात हणमंत अकोसकर सहभागी होते.
संभाजीराजेंचं आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन; ५ हजार तरुण मुंबईकडे रवाना

संपात सहभागी असल्यामुळे पगार मिळत नव्हता, आई-वडील पत्नी दोन लहाणं मुले यांची उपासमार होवू नये म्हणून हणमंत अकोसकर हे मजुरी करुन कुटुंबाचा सांभाळ करत होते. मयत हणमंत अकोसकर यांचा मृतदेहापासून कर्मचारी भावूक झाले होते सरकारविरोधी संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

मनसेचा १६वा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर होणार, राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here