सिंधुदुर्ग: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जीवरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग १६६ जी वरील तळेरे ( ता. कणकवली) पासून करुळ घाट (ता. वैभववाडी – गगनबावडा) हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक तीन आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

गोवावरून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्यावरून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे व कोल्हापूरवरून येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत.

Anganewadi Yatra: आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला प्रारंभ, भाविकांची गर्दी
Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील अवलियाने चक्क तिळाच्या दाण्यावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

करूळ घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या घाटात सुरू असेलल्या जड वाहतुकीमुळे भरलेले खड्डे वारंवार उखडले जात असल्याने काम वेळेत होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. करूळ घाटातून होणारी वाहतूक पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

>> कोल्हापूरवरून येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग १६६ – जीकडे.

>> गोवावरून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्ठ्यावरून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत.

Nitesh Rane: ‘आदित्य ठाकरेंना अडीच वर्षांनी कोकण आठवला; आता भावाला देण्यासाठी नवीन खेकडा पकडायला सिंधुदुर्गात येताय का?’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here