कीव्ह, युक्रेन :

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद फोनवरून साधला.

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांत संभाषण झालं. रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या या संघर्षावर मुत्सद्देगिरी आणि संवादातूनच तोडगा काढला जावा, अशी ठाम भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्रासमोर मांडलीय.

भारत आणि रशिया हे दोन्ही देशांचे जवळकीचे संबंध आहेत. त्यामुळे, रशियाला लष्करी बळाचा वापर करण्यापासून रोखण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी आशा आंतरराष्ट्रीय समुदायाला लागलीय.

Russia Ukraine War: देशप्रेमानं भारलेल्या युक्रेन लष्कराच्या जवानानं स्वत:ला बॉम्बनं उडवलं, रशियन सैन्याचा मार्ग रोखला!
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रहिवासी इमारतीवर कोसळली मिसाईल; स्फोटानं कीव्ह हादरलं

उल्लेखनीय म्हणजे, रशियानं युक्रेनवर हल्ला केला त्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही फोनवरून चर्चा केली होती.

अमेरिका, रशिया तसंच युक्रेन या देशांसोबतचे संबंध पाहता भारतानं आपली भूमिका कायम ठेवली आहे. युक्रेनवरील रशियाच्या लष्करी आक्रमणावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) रशियाविरुद्धच्या ठरावावर मतदानातही भारतानं सहभाग टाळला.

भारत आपल्या जुन्या मित्राविरुद्ध – रशियाविरुद्ध – भूमिका घ्यायला तयार नाही. अमेरिका आणि युरोपातील देशांशी चांगले संबंध असूनही भारतानं रशियाशीही सलोख्याचे संबंध टिकवून ठेवले आहेत.

ukraine russia news : युक्रेनची महिला रशियन सैनिकाला भिडली!, ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल
चर्चा तर होणारचं! कीव्हचं अवकाशातील ‘भूत’ रशियासाठी ठरलं काळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here