औरंगाबाद: आपलं लग्न जरा हटके आणि अविस्मरणीय असायला हवे अशी अनेकांची इच्छा असते. औरंगाबादमध्ये सध्या अशाच एका हटके लग्नाची चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे, आपल्या लाडक्या नवराईला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं. मग काय अख्खं गाव नवरीला निरोप देण्यसाठी हेलिपॅडवर पोहचले.

जालना जिल्ह्यातील अंबड येथील राम लांडे यांचा विवाह कर्माड येथील प्रल्हाद कोरडे यांची कन्या चित्रा सोबत ठरला होता. राम हे अंबड शहरातील युवा सेनेचे तालुका प्रमुख असल्याने अनेक विवाहात त्यांना आमंत्रण असते. प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या लग्नात काही खास आकर्षण असावे. आपल्या लग्नाची आठवण सगळ्यांच्या स्मरणात असावी असे राम यांना वाटले. त्यातून त्यांनी लग्नासाठी हेलिकॉप्टरने जावे व नवरीला हेलिकॉप्टरने घेवून येण्याचा निश्चय केला. हा निश्चय सत्यात उतरवून त्यांनी २५ फेब्रुवारी ला दुपारी करमाड येथील लग्नमंडप गाठले थेट हेलिकॉप्टरनेच.

वाचाः
२५ फेब्रुवारीला संध्याकाळी ६.२५ का चि. राम व चि.सौ कां. चित्रा यांचा विवाहसोहळा थाटामाटात करमाड येथे पार पडला आणि शनिवारी सकाळी ९ वाजता राम आपल्या वधूला सौ चित्रा यांना घेवून हेलिकॉप्टरने अंबड या आपल्या गावी परतले. राम व सौ.चित्रा यांच्या या हेलिकॉप्टर वरातीचा हवाई सोहळा अंबड व करमाड येथील गावकऱ्यांनी अनुभवला. राम यांच्या या विचाराने चित्रा या आनंदाने भारावलेल्या असून कधी स्वप्नातही वाटले नव्हते की आपल्या स्वप्नातला राजकुमार हेलिकॉप्टर ने येईल. त्यामुळे हा आनंद लग्नाचा सोहळा नवदाम्पत्याच्या कायम स्मरणात राहील.

वाचाः
यावेळी बोलताना राम लांडे म्हणाले की, आपल्या लग्नात काही तरी वेगळ करतानाचे अनेक विवाहसोहळे मी पहिले होते. त्यामुळे आपलाही लग्न सोहळा मोठा आणि काहीतरी वेगळं लग्नात व्हावे अशी माझी इच्छा होती. म्हणून आपल्या पत्नीला सुख:द धक्का देण्यासाठी तसेच,जगावेगळ काहीतरी आपल्या लग्नात व्हावे म्हणून मी लग्नात हेलिकॉप्टर घेऊन आल्याच नवरदेव लांडे म्हणाले.

वाचाः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here