मुंबई: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून केंद्र सरकार श्रेयवादाच्या राजकारणात मग्न आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे भीक मागावी लागत आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. मराठी भाषेला आत्ता अभिजात भाषेचा दर्जा दिल्यास त्याचे श्रेय महाविकासआघाडीकडे जाईल. भाजपला हे श्रेय स्वत:कडे घ्यायचे आहे. या मुद्दयाचे श्रेय कोणीही घ्यावे पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. छत्रपतींच्या भाषेला केंद्राच्या दारात जाऊन अशी भीक मागावी लागत असेल त्याला अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भीक मागावी लागत आहे, याचा विचार झाला पाहिजे. केंद्रातील सत्ताधीशांना मराठा भाषेबाबतची मनातील जळमट दूर केली पाहिजेत. मराठी भाषेच्या डोक्यावर अभिजात भाषेचा सुवर्णमुकूट चढवा, असेही संजय राऊत यांनी म्हटले. (Sanjay Raut on Marathi Bhasha Din 2022)
मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांचा महत्त्वाचा निर्णय; अमित ठाकरेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी
यावेळी संजय राऊत यांना यशवंत जाधव यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या प्राप्तीकर विभागाच्या धाडीविषयी विचारण्यात आले. यावर राऊत यांनी म्हटले की, सध्या इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये ही बाब लागू होत नाही. मुंबई आणि महाराष्ट्र देशाला सर्वाधिक कर मिळवून देतो. पण आता महानगरपालिका निवडणुका आल्यामुळे मराठी लोकांच छळ होत आहे. त्यांच्याकडे पैसे उरू नये, असे प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय तपासयंत्रणा फक्त महाराष्ट्राला लक्ष्य करत आहेत. बाकी संपूर्ण देश खाली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी जनता पाहत आहे, असे राऊत यांनी सांगितले.

‘उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार’

मी आणि आदित्य ठाकरे नुकतेच उत्तर प्रदेशात जाऊन आलो. तेथील वातावरण पाहता उत्तर प्रदेशात परिवर्तन होईल. आम्ही तेथील माहौल पाहिला. अखिलेश यादव यांच्या बाजूने हवा असल्यामुळे या निवडणुकीत काँटे की टक्कर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात परिवर्तन होईलच, असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here