म. टा. खास प्रतिनिधी,

एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुंबईतील महिला पत्रकाराला उद्देशून सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करणाऱ्या एका तरुणास नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. असं त्याचं नाव असून तो भारतीय जनता पक्षाच्या नाशिक विभागाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे.

महिला पत्रकाराने ईमेलद्वारे दिलेल्या तक्रारीनुसार, ओझर पोलिसांनी आयटी अॅक्ट, विनयभंग, दमबाजी आदी कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर काही वेळातच उमराने येथील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. अटकेची कारवाई होताच प्रकृती बिघडल्याची तक्रार आरोपीनं केली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संशयित जाधव हा ओझर येथील एचएलमध्ये कार्यरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दीप प्रज्वलनाचं आवाहन देशवासीयांना केलं आहे. त्यांच्या या आवाहनावर टीका होत असून सोशल मीडियात त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. त्याबाबतची वृत्ते प्रसारमाध्यमातून दिली जात आहेत. त्यामुळं संतापलेल्या जाधव यानं ट्विटरवर महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह ट्विट टाकल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय म्हणाले होते मोदी?

‘करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन मोदी यांनी शुक्रवारी जनतेला केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here