कोल्हापूर : पंचगंगा नदीत सांडपाणी आणि दूषित पाणी मिसळल्याने करवीर तालुक्यातील वळीवडे, गांधीनगर गडमुडशिंगी या बंधाऱ्यावर मृत माशांचा थर पाण्यावर तरंगू लागला आहे. एवढ्या प्रमाणात मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. (Panchganga River Pollution)

वळीवडे येथे पंचगंगा नदीत मृत मासे तरंगत असल्याची माहिती समजल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पाण्याचे नमुने, मेलेले मासे घेऊन पंचनामे केले. गेल्या महिन्यात ऑक्सिजन घेण्यासाठी हजारो मासे पाण्याच्या पृष्ठभागावर आले होते. कोल्हापूर शहरासह आसपासच्या गावातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. साखर कारखान्यांची मळीही नदीत मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने पंचगंगेचे पाणी प्रदूषित झालं आहे. त्याचा पहिला फटका नदीतील माशांसह जलचरांना बसला आहे.

पुण्यातील हडपसरमध्ये गादीच्या गोदामाला भीषण आग

वळीवडे, रूकडी, गांधीनगरसह कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प आणि कदमवाडी येथील नदीकाठावर मृत माशांचे खच पाहायला मिळाले. नदीत तरंगणारे मॄत मासे काढून टाकावेत अशी मागणी ई वॉर्ड लोककल्याण समितीचे अॅड. बाबा इंदुलकर, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई ,सागर तामगावे यांनी केली आहे.

नदीतील दूषित पाण्याचा फटका नदीकाठच्या नागरिकांना बसणार आहे. तसंच दुभत्या जनावरांनाही त्रास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पाणी प्रदूषण करणाऱ्या सरकारी निमसरकारी संस्था, कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here