निवडणूकीपूर्वी आपल्याकडे लक्ष कसे वेधता येईल, यासाठी ते भांडत आहेत. परंतु सत्य हे आहे की शहरासाठी या दोन्ही पक्षांनी काहीच केलेलं नाही, अता एकमेकांवर आरोप करतायत. लोक सुज्ञ आहेत, यावेळेस तरी विचार करतील, असे राजू पाटील यांनी म्हटले.

 

Raju Patil MNS (1)

राजू पाटील, मनसे

हायलाइट्स:

  • गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी ६५ किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती
  • या शर्यतीत १०० हून अधिक नागरिक, खेळाडू , डॉक्टर सहभागी झाले होते
प्रदीप भणगे, डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत शिवसेना-भाजप मध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करत, पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शिवसेना आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. गेल्यावेळी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांच्या घशात हात घालून दात काढत होते, आता अजून काय काढत बसतील. तूर्तास ते एकमेकांचे कपडे फाडत आहे. शिवसेना-भाजप पक्ष हे दोघेही अपयशी ठरलेले आहेत. आता निवडणूकीपूर्वी आपल्याकडे लक्ष कसे वेधता येईल, यासाठी ते भांडत आहेत. परंतु सत्य हे आहे की शहरासाठी या दोन्ही पक्षांनी काहीच केलेलं नाही, अता एकमेकांवर आरोप करतायत. लोक सुज्ञ आहेत, यावेळेस तरी विचार करतील, असे राजू पाटील यांनी म्हटले.
नवाब मलिकांबाबत एकनाथ शिंदेंची भूमिका काय, भाजप नेत्याने विचारलेल्या प्रश्नावर वरूण सरदेसाईंचा टोला
डोंबिवलीत मनसेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसेतर्फे आज मोठ्याप्रमाणात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे ‘एक दौड जवानांसाठी’ आयोजित करण्यात आली होती. गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी ६५ किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत १०० हून अधिक नागरिक, खेळाडू , डॉक्टर सहभागी झाले होते. रात्री १२ वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथून त्यांनी धावायला सुरवात केली आणि डोंबिवली येथे सकाळी नऊला पोहोचले. या धावपटूचा सन्मान मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ठाण्यातील प्रभागरचनेबाबत नाराजी, पण एकनाथ शिंदेंचा परिसर ठरला चॉकलेट वॉर्ड
यावेळी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करावा आवाहन केले. तसेच पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या दिवसाच्या निमित्ताने आम्ही अनेक वर्षापासून कार्यक्रम करत असतो. राजसाहेबांचे तर आम्हला स्पष्ट आदेश आहेत की, हा कार्यक्रम प्रत्येक शाखे-शाखेत झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही नियोजन देखील करत असतो,आम्हाला खरंच आनंद आहे इतर पक्ष देखील त्याचे अनुकरण करतायत. आनंद आहे, मराठी वाढली पाहिजे मराठी टिकली पाहिजे, असे राजू पाटील यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns leader raju patil take a dig at shivsena bjp politics in kdmc election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here