रोहा: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रंगलेला राजकीय ‘सामना’, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केलेली ‘डर्टी डझन’ची यादी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आदी सर्व मुद्द्यांवर स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्यांनी जाहीर केलेल्या यादीत अजित पवार यांचं नाव घेण्यात आलं होतं. त्यावर काळ आणि वेळच त्या सर्व गोष्टी दाखवून देईल, अशी सूचक प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आले होते. डॉ. सी. डी. देशमुख सभागृहाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, पालक मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते. सध्याची राजकीय परिस्थिती, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप-प्रत्यारोप, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर बोलताना त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तरे दिली.

Ajit Pawar : संभाजीराजेंचे मुंबईत उपोषण, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…मग काय करू? तुरुंगात जाऊ का?; पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार भडकले!

आजकालचे राजकारण हे दिशाहीन झालं आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे. राज्याची ही परंपरा आणि संस्कृती नाही. प्रत्येकाने आवर घालायला हवा. विकासाचे राजकारण करावे. चुकीचे वागू नये याची खबरदारी सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सध्याचे जे काही आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, कुरघोडी आणि टिप्पणी केली जात आहे, ही बाब मला अजिबात पटत नाही. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार इतकंच काय तर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात बघितलं तर, सत्ताधारी-विरोधक कधीच कुणाबाबत एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले नाहीत. शरद पवार आणि बाळासाहेब हे नेहमीच एकमेकांवर टिप्पणी करायचे. पण आता जसं बोललं जातं, असं कधीच बोलले नाहीत. आताच्या काळात तर असं होताना दिसत नाही, हे दुर्दैवं आहे. जे चुकीचं बोलतात, त्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण केलं पाहिजे आणि त्यात सुधारणा केली पाहिजे, असं पवार म्हणाले.

भाजपकडून ईडीचा वापर केला जातोय असा सध्या आरोप होत आहे. याबाबत अजित पवार यांनी आपले मत मांडले. जे काही असेल ते नियमाने केले पाहिजे. सूडबुद्धीने काही करता कामा नये, असे ते म्हणाले. किरीट सोमय्यांनी डर्टी डझनची यादी जाहीर केली. त्यात अजित पवारांसह अनेक नेत्यांची नावं घेतली. त्याबाबत बोलताना, कुणी कुणाचं नाव घ्यावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. काळ आणि वेळ या सगळ्या गोष्टी दाखवून देईलच, असं ते म्हणाले. राणेंबाबत बोलताना म्हणाले की, या सर्व गोष्टी प्रक्रियेचा भाग आहे. त्यात काही तथ्य असेल तर, कारवाई होते आणि तथ्य नसेल तर, कारवाई होत नाही.

Kirit Somaiya:शिवसेना नेत्यांपाठोपाठ आता इकबाल सिंह चहल सोमय्यांच्या रडारवर; आयुक्तपदावरून हकालपट्टीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here