Sangli Mseb Fire : शेतीसाठी दिवसा वीज द्या, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरबरोबर आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या अज्ञात शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे  (MSEB) सब स्टेशन पेटवल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री शेतकऱ्यांनी हे सब स्टेशन पेटवल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने महावितरणचे सब स्टेशन पेटवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे होती. त्या सर्व कागदपत्रासह अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. कोल्हापूरमध्ये शेतकरी आंदोलनाची धग असतनाचा आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील दिवसा वीज द्यावी या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here