मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात करोना लाट आटोक्यात आल्याचे चित्र आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी झाल्यामुळे हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी राज्यात २ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापूर्वी करोना मृत्यूची सर्वात कमी नोंद पहिल्या लाटेदरम्यान झाली होती. ३० मार्च २०२० रोजी करोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. २३ महिन्यांनी म्हणजेच जवळपास दोन वर्षांनंतर राज्यात कमी मृत्यूची नोंद झाली आहे.

वाहन क्रमांक बदला, ई-चलान चुकवा;नियम मोडणाऱ्यांनी लढवली वाहनक्रमांक बदलण्याची शक्कलहरित मुंबईसाठी उंच इमारतींच्या गच्चीचा पर्याय

पुण्यात सर्वात सक्रिय रुग्ण

सध्याच्या परिस्थितीत राज्यात ७२२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. पुण्यात २५४१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मुंबईत ८३८ सक्रिय रुग्ण आहेत. तिसऱ्या स्थानी अहमदनगर आणि चौथ्या स्थानी ठाणे आहे. अहमदनगरमध्ये ६४५ आणि ठाण्यात ५५८ सक्रिय रुग्ण आहेत.

होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ८७ टक्क्यांनी घटली

राज्यात होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. २७ दिवसांत होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ८७ टक्क्यांनी घटली आहे. १ फेब्रुवारीला होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या १०६९५९६ होती. ती २७ फेब्रुवारीला कमी होऊन १३६४४५ पर्यंत आली आहे. हीच परिस्थिती कोविड सेंटरमध्ये देखील पाहायला मिळतेय. कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या ७३ टक्क्यांनी कमी झाली आहे. १ फेब्रुवारीला कोविड सेंटरमध्ये २७३१ रुग्ण क्वारंटाइन होते, तर २७ फेब्रुवारीला संख्या कमी होऊन ७४४ वर आली आहे.

शिवसेना २०२४मध्ये दिल्लीच्या तख्तावर; आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार
मुंबईत फेब्रुवारीत आठव्यांदा शून्य मृत्यू

करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेदरम्यान सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. दुसऱ्या लाटेत डिसेंबरमध्ये सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली झाली होती. आता तिसऱ्या लाटेदरम्यान फेब्रुवारीत आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here