नव्यानं आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे. मुंबईत कालपर्यंत २७८ रुग्ण होते. आज त्यात आणखी २८ जणांची भर पडली आहे. त्यामुळं हा आकडा आता ३०६ झाला आहे. राज्यात आतापर्यंत २७ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेनं आजपासून आणखी १० ठिकाणी करोना संशयितांची तपासणी करण्यासाठी दवाखाने सुरू केले आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या व ‘कंटेनमेंट झोन’ लगतच्या परिसरात हे दवाखाने आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांच्या कालावधीत हे दवाखाने सुरू राहणार आहेत. इथं एक डॉक्टर आणि एक परिचारिका असा स्टाफ असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times