दरम्यान, यावेळी बोलताना एसटी संप जास्त ताणू नका असा सबुरीचाही सल्ला राजेश टोपे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करणार असून आता एसटी चालवण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवावे लागत आहेत. या पार्श्वूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त ताणू नये असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
जालना जिल्ह्यातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राजेश टोपे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर टोपे यांनी हे आवाहन केलं. याआधी देखील परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार असून एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त न ताणवता चर्चेने मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटल आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशीदेखील या विषयासंदर्भात चर्चा केली जाईल अशी खात्री टोपे यांनी दिली आहे.