नागपूर : राज्यातच काय तर एकंदरीत देशभराचा विचार केला तर तरुणांमध्ये नशेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जागोजागी हल्ली टपऱ्या आणि दारुची दुकानं आपल्याला सहज पाहायला मिळतात. कितीही नो स्मोकिंगचे बोर्ड लावले तरी यातून सुधारणा होत असल्याचं दिसलं नाही. त्यामुळे आता प्रशासनाने वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेगाड्या किंवा रेल्वेस्थानक परिसरात सिगारेट किंवा अन्य तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध मध्य रेल्वेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ व २५ फेब्रुवारी रोजी १६० जणांकडून २९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ व नागपूर विभागात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

St Strike News : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
रेल्वे कायद्यानुसार गाड्या तसेच रेल्वेस्थानक परिसरात तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करणे, सिगारेट ओढणे याला बंदी आहे. मात्र, तरीही अनेक प्रवाशी त्याकडे दुर्लक्ष करून या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत असतात. याचा अन्य प्रवाशांना त्रास तर होतोच; शिवाय सिगारेटमुळे गाडीत आग लागण्याचाही धोका असतो. त्यामुळेच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या दोन दिवसांत नागपूर विभागात अशाप्रकारे धूम्रपान करताना आढळलेल्या ३७ प्रवाशांकडून ७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी असे प्रकार टाळावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
एअरोस्पेस, डिफेन्स हबसाठी नव्याने प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here