बुलडाणा : बुलडाण्यामध्ये शाळेची बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये २ जण जागीच ठार झाले आहेत. बुलडाण्याच्या चिखली येथील अनुराधा इंग्रजी शाळेच्या बसने ऑटोला धडक दिली. यात २ जण जागीच ठार तर २ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज २८ फेब्रुवारीला सकाळी पावणे दहाच्या सुमारास चिखली- साकेगाव रोडवरील अनुराधा इंग्रजी शाळेजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथून प्रवासी घेऊन ऑटो क्रमांक एमएच २८ टि ३७०७ हा चिखलीकडे जात होता तर विद्यार्थ्यांना ने-आण करणारी अनुराधा इंग्रजी शाळेची बस क्रमांक एमएच २८ एबी ७२३६ ही शाळेकडे जात होती. ऑटोमध्ये चालक व ३ प्रवासी होते. सकाळी पावणे दहाच्या सुमारास ऑटोला भरधाव बसने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

सिगारेट ओढणाऱ्यांनो, मुंबईसह ‘या’ रेल्वे स्थानकांबाहेर तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन केल्यास पडेल महागात

यात धनंजय अनिल वाघ (१६) हा दहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला.तो चिखली येथे कोचिंग क्लाससाठी येत होता. माधव केशव इंगळे (६३) यांना उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऑटोचालक आशिष मदन वाघ (२०) व शुभम गजानन वाघ (२३) गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, अपघातानंतर स्कूल बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघातावेळी बसमध्ये विद्यार्थी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र सुदैवाने यापैकी कुणालाही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं तर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

St Strike News : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here