औरंगाबाद : समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय?’ असं विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल औरंगाबाद येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कळाले नसतील तर नाक खुपसू नका, आता तुमचं निवृत्तीचं वय झालंय, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

यावेळी बोलताना विनोद पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. माहित नसलेला इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. खरतर, हे बघितल्यानंतर राज्यपालांच्या मनामध्ये, पोटामध्ये जे होतं ते ओठावर आलं आहे. त्यामुळे राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नसेल तर त्यांनी या विषयांमध्ये नाक खुपसू नयेत आणि चुकीच्या गोष्टी आमच्यासमोर मांडू नयेत असं विनोद पाटील म्हणाले.

संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या यशाबद्दल उदयनराजेंना शंका, कारण…
तर राज्यपालांचा वयाचा विचार करता आता त्यांना निवृत्तीची गरज असून, हे कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. अशा राज्यपालांची तात्काळ उचलबांगडी करावी, तसेच असे राज्यपाल महाराष्ट्राला नको ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळाले नाही. तर राज्यपालांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा त्यांच्या वयाचा विचार न करता गरज पडल्यास त्यांचे धोतर फेडू, असं विनोद पाटील म्हणाले.

St Strike News : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here