Sambhajiraje Chhatrapati Protest : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी संयोगीता तसंच अनेक कार्यकर्तेही उपस्थित आहेत. दरम्यान छत्रपतींच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देताना वारकऱ्यांनी अभंग सादर केला असता छत्रपती भावूक होऊन त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईतील आझाद मैदान येथे संभाजीराजेंच्या उपोषणाला सुरूवात झाली आहे. यावेळी छत्रपतींची भेट घेण्यासाठी अनेकजण येत आहेत. याचवेळी छत्रपतींच्या आमरण उपोषणाला मावळ वारकरी संप्रदयाच्यावतीने पाठिंबा देण्यासाठी त्याठिकाणी अभंग सादर करण्यात आला. हा अभंग ऐकल्यानंतर संभाजीराजेंना अक्षरश: अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपतींचे पानावलेले डोळे त्यांनी पुसताना कॅमेऱ्यात कैद झालं असून त्यांच्या सोशल मीडियावर यासंबधीचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरात कडकडीत बंद

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करीत असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे याना पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला . यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नागरीकातून मोठा संताप दिसून आला . आज बंद सुरु असताना छत्रपती शिवाजी चौकात मराठा संघटनांनी बोंबाबोंब आंदोलन करीत राज्यपाल  कोश्यारी याना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी

 संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा

15 फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही.  महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.

22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात

खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.  आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.  त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.  याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली 11 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. संभाजीराजे म्हणाले की,  यातून मार्ग निघाला पाहिजे.  गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण इथे आहोत.   मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचं नेतृत्व करतो.  आपण मार्ग काढून यावं अशी माझी विनंती आहे, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here