…म्हणून निर्णयाला झाला उशीर
मुंबई लोकलमधील लससक्तीबाबत हायकोर्टाने सातत्याने विचारणा केल्यानंतर आता राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. ‘युक्रेनमधील युद्ध संकटात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत, त्यामुळे सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मुख्य सचिव व्यस्त आहेत. त्यामुळे निर्बंधांबाबतच्या निर्णयावर मुख्य सचिव आज सही करतील,’ अशी माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टाला दिली आहे.
हायकोर्टाने सरकारला सुनावलं!
राज्य सरकारने लोकल प्रवासासाठी करोनाची लस घेणं सक्तीचं केल्यानंतर हायकोर्टाने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र बरेच दिवस लोटल्यानंतर सरकारने भूमिका न घेतल्याने कोर्टाकडून आता कडक शब्दांत सरकारला सूचना दिल्या जात आहेत. ‘तुमचे मुख्य सचिव आज निवृत्त होत आहेत, मग त्यांची सही झाली नाही म्हणून नंतर आणखी अवधी मागू नका,’ अशा शब्दांत हायकोर्टाने सुनावलं. त्यानंतर मुख्य सचिव आजच सही करतील, असं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं आहे.