बुलडाणा : मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा अडवण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काल रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. अशातच आज शेगाव येथील शिवाजी चौकात एका १२ वर्षीय मराठा मुलाने उर्जामंत्री नितीन राऊतांचा ताफा अडवला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचा ताफा अडवला.

St Strike News : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
हा ताफा अडवून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबाबत नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आलं आहे. राऊत दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर असून हा ताफा अडवल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.

सिगारेट ओढणाऱ्यांनो, मुंबईसह ‘या’ रेल्वे स्थानकांबाहेर तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन केल्यास पडेल महागात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here