बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील घरातली कामं करताना दिसत आहे. दीपिका स्वयंपाक घरात रमली असून नवरोबा म्हणजेच रणवीरसाठी रोज नव नवीन पदार्थ बनवताना दिसतेय. रणवीर दीपिकानं बनलेले पदार्थ चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही.
रणवीरनं नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये दीपिकानं वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतायत. दीपिकानं रणवीरसाठी थाय सलाड, थाय ग्रीन करी, राइस, व्हेजीटेबल सूप इतके पदार्थ बनवले होते. दीपिका इतक्यावरच थांबली नाही तर तिनं रणवीरसाठी केक देखील बनवला होता. रणवीर केवळ दीपिकानं बनलेल्या पदार्थांचे फोटो शेअर करत नाही तर तिचं कौतुकही करतो.
वाचा:
पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत
करोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केल्यानंतर दीपिका आणि रणवीर यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. मदतीचा आकडा त्यांनी गुप्त ठेवला आहे. त्यामुळं त्यांनी किती मदत केली हे कळू शकलं नाही
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times