जालना : रशिया आणि युक्रेन यांच्या भडकलेल्या युद्ध परिस्थितीने खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात देखील तेजी आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झाल्यानं गेल्या ४ दिवसांतच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे तब्बल १ हजार रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
तर आता यापुढे उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्यामुळे आणखी भाववाढ होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेली सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणावी असं आवाहन व्यापाऱ्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे.