शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य; वादानंतर राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण – governor bhagat singh koshyari gave an explanation regarding the controversial statement made about chhatrapati shivaji maharaj
जळगाव : औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यभरात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसंच राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या वक्तव्याविषयी राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Governor Bhagat Singh Koshyari News)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जळगावात बोलताना म्हटलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे ऊर्जा स्त्रोत आहेत. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं माझ्या वाचनात आलं होतं. मात्र इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितली आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो आणि त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय घेतो,’ अशी प्रतिक्रिया जळगावात कोश्यारी यांनी दिली आहे. जळगाव विद्यापीठातील जलतरण तलावासंदर्भातील एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर कोश्यारी यांनी वादाबाबत आपली बाजू मांडली आहे. Breaking Breaking खासदार संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे; सरकारने दिले ‘हे’ आश्वासन
तुम्ही केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असं राज्यपाल यांना विचारलं असता त्यांनी पत्रकारांशी अधिक बोलणं टाळत निघूण जाणं पसंत केलं.
नेमका काय आहे वाद?
औरंगाबादेतील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते,’ असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं. गुरूचं महत्व सांगताना आपण हे वक्तव्य केल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे. मात्र या वक्तव्यातून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि राज्यभर कोश्यारी यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.