उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे:
>> जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस एकच आहे.
>> इलाज एकच, नाईलाज म्हणून घरात राहणे
डॉक्टर, परिचारिकांसोबत गैरवर्तन कराल तर खबरदार, सहन केलं जाणार नाही.
>> समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्यांनो खबरदार
>> बोगस व्हिडिओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका
>> बनावट व्हिडिओज पाठवून दुफळी निर्माण करू नका.
>> महाराष्ट्रात चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली, करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये असाध्य रोगी, वृद्ध जास्त आहेत. वृद्धांची अधिक काळजी घेणार
>> सर्व धर्मियांनी आपले सण, उत्सव घरातच साजरे करावेत
>> तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही, मरकजमधून आलेले १०० टक्के लोक विलगीकरण कक्षात
>> राज्यात अडकलेल्या परप्रांतियांची आम्ही सोय केली आहे, त्यांनी घाबरुन जाऊ नये.
>> परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूर, कामगारांनी काळजी घ्या, जिथं असाल तिथं थांबा, तुमची सोय केली जाईल
>> माझा माझ्यावर विश्वास आहे, पण तुमच्यावरही आहे. आत्मविश्वास असेल तर लढाई जिंकता येते. करोना आपली परीक्षा पाहतोय, ज्याचा संयम तुटेल तो हरेल
>> पुढील सूचनांपर्यंत महाराष्ट्रात कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा सोहळे होणार नाहीत.
>> अभिनेता शाहरुख खानने क्वारंटाइन कक्षासाठी जागा दिली आहे, ताज हॉटेलमध्ये डॉक्टरांना राहण्या-खाण्याची सोय केली जात आहे. प्रत्येक जण सिंहाचा, खारीचा वाटा उचलत आहे. सर्वांना धन्यवाद
>> सात वर्षांच्या आराध्याने वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. हीच महाराष्ट्राची ओळख आहे. संस्कृती आहे. एका सात वर्षांच्या मुलीत ही समज आली आहे. आता आपण हे युद्ध जिंकलं असंच समजा.
>> मुंबईत चाचणी केंद्रांची संख्या वाढवत आहोत. मुंबईत कोविडवर उपचार करणारे हॉस्पिटल आजपासून सुरू केले आहेत.
>> सर्दी, खोकला, ताप असेल तर कोविडसाठी रुग्णालये आहेत, तिथेच जा. तिथे चाचणी करा. खासगी रुग्णालयांत जाऊ नका.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times