रत्नागिरी: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाला असून, पक्षाच्या नेत्यांकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई करून, त्यांना अटक केली आहे. सध्या नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता भाजपचे नेते नीलेश राणे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. केवळ राजीनामा घेऊन मलिक यांच्या दाऊद कनेक्शनचा मुद्दा सोडून देण्यासारखा नाही. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी राणे यांनी रत्नागिरीत बोलताना केली.

Nawab Malik : ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची हायकोर्टात धावउद्धव ठाकरे स्वत: पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई अशक्य; किरीट सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं

नीलेश राणे म्हणाले, ‘नवाब मलिक यांचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यांचा केवळ राजीनामा घेऊन हा विषय सोडून देण्यासारखा नाही. देशाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिमसोबत त्यांनी केलेला आर्थिक व्यवहार हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला तुरुंगात टाकून त्या व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीलाही लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचा नेता असलेले नवाब मलिक यांचा संबध हसीना पारकरच्या माध्यमातून थेट दाऊदशी येतो. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा माणसाला पवार यांनी थारा देऊ नये. एवढे होऊनही महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांच्यासाठी रस्त्यावर बसतात हे फार धक्कादायक आहे, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे काही करतोय, ते लोकांच्या लक्षात येत आहे. हे पवार यांनीही लक्षात घ्यायला हवे. ‘मैं झुकेगा नहीं’ म्हणायला नवाब मलिक हे काय युद्ध जिंकून आलेत का? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. हे सर्व प्रकरण बघता, नवाब मलिक हे दाऊद इब्राहिमचे फ्रंटमॅन असू शकतात अशी शंका राणे यांनी उपस्थित केली. अख्ख्या मुंबईत २५ रुपये चौरस फुटाने कुठे जागा मिळते, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने आम्हाला सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

संजय राऊत यांच्यावर निशाणा

सध्या संजय राऊत यांची देहबोली बघितली तर, ते पूर्णपणे ढेपाळलेत हे लक्षात येईल, अशी टीका राणे यांनी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नका, ठाम भूमिका घ्या; भाजपचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा: शेलार

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here