Sunil Tambe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 1, 2022, 5:45 PM
सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आफ्रिकेतील एका महिलेला अमली पदार्थासह अटक केली आहे. विभागाने या महिलेकडून ८ किलो वजनाचे तब्बल ५६ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. ही माहिती सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्याने दिली.

‘ती’ विमानतळावरून ५६ कोटींचे हेरॉइन नेत होती; सीमाशुल्क विभागाने पकडले
हायलाइट्स:
- मुंबई विमानतळावर आफ्रिकेतील महिलेला अटक.
- महिलेकरून ५६ कोटींचे हेरॉईन जप्त.
- सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई.
सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी या महिलेची तपासणी असती त्यांना तिच्याकडे पांढरी पावडर आढळली. मात्र, पुढील तपासणीत ही पावडर हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : african woman arrested with heroin worth rs 56 crore at mumbai airport
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network