नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्ध क्राइस्टचर्चे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार खेळ केला आणि विजय मिळवला. न्यूझीलंडचा दुसरा डाव फक्त २२७ धावा संपुष्टात आला. मालिकेतील पहिली लढत गमावलेल्या द.आफ्रिकेने दुसऱ्या विजयासह मालिका बरोबरीत सोडवली. दोन्ही संघातील ही मालिका संपल्यानंतर आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात मोठा बदल झाला असून हा बदल भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचा आहे.

वाचा- १० कोटी कोणाला मिळणार; भारतीय संघ देखील दावेदार, जाणून घ्या…

दुसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ WTC गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. द.आफ्रिकेकडून एकूण ३६ गुण आहेत आणि त्यांच्या विजयाची टक्केवारी ४० इतकी आहे. तर सामना गमावल्यामुळे विद्यमान विजेते न्यूझीलंड सहाव्या स्थानावर घसरले आहेत. गुणतक्त्यात श्रीलंकेचा संघ अद्याप पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी १०० इतकी आहे. श्रीलंकेने आतापर्यंत एक मालिका आणि २ कसोटी खेळल्या आहेत. त्यांनी दोन्ही कसोटीत विजय मिळवला आहे.

वाचा- IPL सुरू होण्याआधी हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स संघाला मोठा झटका

भारतीय संघाचा विचार केल्यास ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत. भारताने ३ मालिका खेळल्या असून त्यामध्ये ९ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी ४ मध्ये विजय, ३ मध्ये पराभव आणि २ सामने ड्रॉ झाले आहेत. भारताने पेनाल्टी ओव्हर्समुळे ३ गुण देखील गमावले आहेत. भारताच्या विजयाची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे.

वाचा- सूर्यकुमार आणि श्रेयस म्हणजे मोठी डोकेदुखी; कर्णधार रोहित शर्मा असे का म्हणाला.

टीम इंडियाची सध्याची स्थिती पाहता वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवणे अवघड दिसत आहे. कारण या वर्षी भारताला फक्त ३ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी २ लंकेविरुद्ध तर १ इंग्लंडविरुद्ध खेळायची आहे. इंग्लंडविरुद्धची लढत ही गेल्या वर्षी करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली लढत आहे. त्यानंतर भारत थेट पुढील वर्ष कसोटी खेळणार आहे.

वाचा- दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदावरून हटवले; श्रेयस अय्यरने प्रथमच दिली प्रतिक्रिया

काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले आहे. अजून त्याने कर्णधार म्हणून एकही सामना खेळला नाही आणि हिटमॅनसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. रोहित हे आव्हान कसे पार करतो याची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट विश्वाला असेल. भारताने पहिल्याच WTCच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here