कीव्ह, युक्रेन :

रशिया आणि युक्रेन दरम्यान बेलारूसमध्ये चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. युद्धाच्या सलग सहाव्या रशियानं आपलं लष्कर कीव्हमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला रशियाचा हा प्रयत्न दुबळ्या समजल्या गेलेल्या युक्रेनसमोर आजही फोल ठरलाय. युक्रेनी लष्करानं गनिमी काव्यानं रशियाचे सगळे विध्वंसक मनसुबे हाणून पाडलेत.

दरम्यान, युद्धादरम्यानचा विध्वंस स्पष्टपणे दर्शवणारे युक्रेनच्या रस्त्यारस्त्यांवरचे अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत. युक्रेनचे सैन्य गनिमी काव्यानं रशियन सैन्याच्या मोठ्या ताफ्यांना लक्ष्य करत आहेत.

Vladimir Putin: युक्रेन हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांना वैयक्तिकरित्या मोठा झटका
‘आई मी घाबरलोय, युक्रेनमध्ये नागरिकांनाही टार्गेट केलं जातंय’, रशियन सैनिकाचा ‘तो’ शेवटचा मॅसेज
रस्त्यारस्त्यांवर विध्वंसाच्या खुणा

पाश्चात्य देशांकडून मिळालेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या आधारे युक्रेनच्या लष्करानं रशियाचं मोठं नुकसान केलंय. रशियन सैन्याचे रणगाडे, तोफा, लष्करी वाहनं कीव्हच्या मार्गावर उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. रशियाच्या ४५०० सैनिकांचा या युद्धात बळी गेल्याचा दावा युक्रेनकडून सोमवारी करण्यात आला होता. यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन काही मागे हटण्यास तयार नाहीत.

‘सीएनएन’च्या रिपोर्टनुसार, कीव्हच्या बाह्य भागात जोरदार युद्ध सुरू आहे. मात्र, युक्रेनच्या लष्कराने अनेक आघाड्यांवर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या रशियाला मागे टाकलंय. रशियन सैन्याच्या ताफ्यांवर युक्रेनियन सैन्यानं केलेल्या कारवाईच्या खुणा रस्त्यावर स्पष्टपणे दिसून येत आहेत. युक्रेननं रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनी रशियन सैन्याची अनेक वाहनं नष्ट केली आहेत. रस्त्यावर उद्ध्वस्त झालेल्या वाहनांभोवती अनेक सैनिकांचे मृतदेहांचा खच पडलेला दिसून येतोय. हे मृतदेह लढाईत मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांचे असल्याचा दावा केला जातोय.

ukraine news : ‘भारतीयांनो… तातडीने कीव्ह सोडा’, राजदुतांची सूचना; रशिया संहारक हल्ल्याच्या तयारीत
Operation Ganga: युक्रेनमध्ये भारताचं ‘ऑपरेशन गंगा’, आठव्या विमानानं बुडापेस्टमधून घेतलं उड्डाण
रशियाच्या गाड्यांवर V चिन्ह

रशियाच्या अनेक गाड्यांवर V हे चिन्हं दिसून येतंय. याचा अर्थ आहे ‘व्होस्टोव्ह’… ही रशियन आर्मी ईस्टर्न कमांड अंतर्गत येणारी यंत्रसामग्री आहे. एका वरिष्ठ युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यानं केलेल्या दाव्यानुसार, युक्रेनचं सैनिक रशियन लष्करावर भारी पडतंय. युक्रेनला गिळून पाहणाऱ्या रशियन सैनिकांना पिटाळून लावलं जातंय. मात्र, युक्रेनच्या या दाव्याची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकलेली नाही. शेवटी विजय युक्रेनचाच होईल, असा दावाही या अधिकाऱ्यानं केलाय.

रशियाकडून युक्रेनवर क्रूर हल्ले

रशियन सैन्यानं युक्रेनवर हल्ले करताना सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत. रशियाकडून युक्रेनच्या लष्करी तळांना निशाण्यावर अवजड शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्रांचा हल्ल्यासाठी वापर करण्यात येतोय. असं असलं तरी जगासमोर एकाकी पडलेलं युक्रेन लष्कर आणि सामान्य नागरिक प्राणपणानं या हल्ल्यांना सामोरे जात आहेत.

रशियन क्षेपणास्त्रांनी खार्किव आणि कीव्हसह अनेक शहरांना आपल्या निशाण्यावर घेतलंय. रशियानं खार्किव शहरातील मध्यवर्ती चौकात क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा खुद्द युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी रशियाला ‘निर्विवाद दहशतवादी’ म्हणत असे हल्ले कुणीही माफ करणार नाही, असं म्हटलंय. मंगळवारी युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या शहरात रशियानं सामान्य नागरिकांनावरही गोळीबार केल्याचं समोर येतंय.

Russian Military Convoy: युक्रेनला उद्ध्वस्त करणार? कीव्हच्या मार्गावर ६४ किमी लांब रशियन लष्करी ताफा
युक्रेनचा कडवा प्रतिकार; रशियासोबतच्या चर्चेत सैन्य मागे घेण्याची भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here