कोल्हापूर : ‘ईडीने कारवाई केलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा बुधवारपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही,’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीनंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्र आणि समाजरक्षणाची भूमिका घेतली होती. आता त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना साथ देणाऱ्या मंत्र्यांची पाठराखण करतात हे अतिशय धक्कादायक आहे. असली कसली राजकीत तडजोड असू शकते? मलिकांचा राजीनामा होईपर्यंत भाजपा आंदोलन करत राहील,’ असं पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.

volodymyr zelenskyy : युक्रेनच्या अध्यक्षांनी ‘हे’ पाऊल उचलत रशियावर टाकला ‘बॉम्ब’!, युरोपियन संसदेने दिले स्टँडिंग ओवेशन

‘मंत्रिमंडळात कोण शिल्लक राहणार हे शोधण्याची वेळ’

‘मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन ही मंत्री मलिक यांनी खरेदी केली आहे. त्यांच्यावर ईडी आणि एनआयएची कारवाई सुरू आहे. तरीही त्यांचा राजीनामा होत नाही. महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयात येऊन आंदोलन करतात. हे कशाचे लक्षण आहे? महाविकास आघाडी सरकार हे दाऊदचे समर्थन करत असल्याचं चित्र आहे. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर वेगवेगळ्या गुन्ह्याखाली कारवाई होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोण शिल्लक राहतं, हे दुर्बिण लावून शोधण्याची वेळ आली आहे,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, ‘शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा होऊ शकतो तर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा का नाही, याचा जाब शिवसैनिकांनी विचारावा,’ असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here