मोखाडा: महिलेचा पाठलाग करून तिच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे घडली. याबाबत पोलिसांनी बुधवारी माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. ४५ वर्षीय आरोपीने महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर तिच्यावर कोयत्याने वार केले. सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

धक्कादायक! उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा
धक्कादायक! परीक्षेसाठी आल्याचं सांगून तरुणी गेस्ट हाऊसमध्ये राहिली, यानंतर जे झालं ते वाचून हादराल

तुळशीराम असे ४५ वर्षीय आरोपीचे नाव असून, तो येथील पाड्यातील रहिवासी आहे. आरोपी मध्यरात्री पीडितेच्या घरात घुसला. त्यावेळी तिचा पती बाहेर गेला होता. त्याचा गैरफायदा उचलण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. पीडितेने प्रतिकार केला. त्यावर आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेनंतर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

Pen news : भाजप आमदारपुत्राला ‘ती’ पोस्ट व्हायरल करणे भोवले; ३ महिन्यांची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here