मुंबई: ‘वाढदिवसाचा खर्च टाळून करोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देणाऱ्या सोलापूरमधील सात वर्षांच्या आराध्याचे यांनी आज जाहीर कौतुक केलं आहे. ‘सात वर्षांच्या मुलीनं दाखवलेली ही समज म्हणजे आपण करोनाविरुद्ध युद्ध जिंकल्याचं द्योतक आहे,’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज्यातील जनतेशी सोशल मीडियातून संवाद साधत आहेत. जनतेला विश्वास देतानाच अनेक गोष्टींची माहितीही देत आहेत. आज त्यांनी राज्यातील जनतेकडून होणाऱ्या मदतीची माहिती दिली. त्यात विशेषकरून त्यांनी सोलापूरच्या आराध्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज आराध्याचा सातवा वाढदिवस आहे. हे वय हट्ट करण्याचं, लाड पुरवून घेण्याचं आहे. वाढदिवस साजरा करून घेण्याचं आहे. पण तिनं आज एक आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. आज आराध्यानं तिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान दिलं आहे. हे एक आगळंवेगळं उदाहरण आहे. हीच महाराष्ट्राची वृत्ती, ओळख आहे. ही समज सात वर्षांच्या मुलीमध्ये असेल तर हे युद्ध जिंकलंच समजा.’

मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाजातील इतर वर्गांकडून होणाऱ्या सहकार्याचाही उल्लेख केला. ‘या युद्धामध्ये सर्वजण जात-पात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलेत. पंतप्रधान चर्चा करत असतात. आज सोनिया गांधींनीही फोन केला होता. पवारसाहेब सोबत आहेतच. सर्व धर्माचे धर्मगुरू सोबत आहेत. काही मुल्ला-मौलवीशीही माझी चर्चा झालीय. माझ्या आवाहनानंतर त्यांनीही समाजाला शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अनेक संस्था, कलाकार, खेळाडू, दिग्गज आपापल्या परीनं मदत करत आहेत. शाहरुख खानसारखे काही लोक कुणी विलगीकरणासाठी जागा करून देताहेत. ताज, ट्रायडंट हॉटेलांनी डॉक्टरांच्या जेवणाची व्यवस्था केलीय. कुणी पैसे देताहेत. अन्न देताहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. करोनाविरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या या सर्वांचे त्यांनी आभारही मानले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here