नागपूर : वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेतकऱ्यांना आधीच खूप वाईट दिवस पाहावे लागले. त्यात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. सततच्या पावसाळी वातावरणाला कंटाळलेल्या नागपूरकरांना आता काहीसे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ होऊ लागली असून पारा ३४ अंशांपर्यंत पोहोचला आहे.

मान्सूननंतरसुद्धा यंदा सातत्याने पावसाची हजेरी लागत होती. यामुळे शहर व विदर्भातील वातावरणातही बदल होत होते. यंदा हिवाळ्याची भट्टी म्हणावी तशी जमलीच नाही. थंडीची केवळ एकच लाट आली. या सगळ्या बदलामुळे तापमानातील चढ-उतार सुरूच होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून शहरातील वातावरण हळूहळू कोरडे होऊ लागले आहे.

धक्कादायक! परीक्षेसाठी आल्याचं सांगून तरुणी गेस्ट हाऊसमध्ये राहिली, यानंतर जे झालं ते वाचून हादराल
मंगळवारी शहरात ३४.४ इतक्या कमाल आणि १९.६ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारचे कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा ०.८ अशांनी, तर किमान तापमान हे सरासरी किमान तापमानाच्या २.६ अंशांनी अधिक होते.

पुढील दोन काळ किमान तापमान हे सरासरी तापमानापेक्षा २ ते ४ अंशांनी अधिकच राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, ३ मार्चनंतर किमान तापमानात थोडीफार घसरण होऊन ते सरासरी तापमानाइतके किंवा त्यापेक्षा किंचित खाली घसरू शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाशिवरात्रीला आई-मुलाचा धक्कादायक शेवट, काळजाचा ठोका चुकावणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here