मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाकडून कोणताही तातडीचा दिलासा मिळालेला नाही. ईडीने बेकायदा आणि राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याचे सांगून ईडी कोठडीला मलिक यांनी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मुंबई हायकोर्टाने या याचिकेवर आता ७ मार्चला सुनावणी ठेवली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या मलिक यांनी मुंबई हायकोर्टात तातडीचा दिलासा मिळावा म्हणून धाव घेतली होती. ईडीने बेकायदेशीरपणे आणि राजकीय सूडबुद्धीने अटक केली आणि विशेष पीएमएलए कोर्टाने ईडी कोठडीचा चुकीचा आदेश दिला, असे म्हणत मलिक यांनी मुंबई हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टात प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. न्या. सुनील शुक्रे व न्या. गोविंदा सानप यांच्या खंडपीठाने या याचिकेवर ७ मार्चला पुढील सुनावणी ठेवली. मलिक यांची कोठडी वाढली किंवा नाही वाढली, तरी दोन्ही पक्षकारांचे कायदेशीर हक्क अबाधित असतील, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

अधिवेशनापूर्वी गोंधळ करण्याचा मनसुबा जाहीर करणं ही भाजपची कार्यपद्धती | जयंत पाटील

Devendra Fadnavis: तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला इशारा

मलिक काय म्हणाले होते याचिकेत?

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा नोंदवून केलेली अटक आणि विशेष पीएमएलए न्यायालयाने दिलेला ईडी कोठडीचा आदेश याला आव्हान देण्यासाठी नवाब मलिक यांनी याचिका दाखल केली होती. ‘मलिक यांची ईडी कोठडी ३ मार्चपर्यंत असल्याने या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे. ज्या खंडपीठासमोर (न्या. वराळे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ) हा विषय सुनावणीस जाणे अपेक्षित आहे ते खंडपीठ सध्या उपलब्ध नाही’, असे मलिक यांच्यातर्फे अॅड. तारक सय्यद व अॅड. कुशल मोर यांनी मंगळवारी न्या. संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला निदर्शनास आणले. तेव्हा, ‘आमचे खंडपीठही बुधवारी उपलब्ध नसून तातडीची सुनावणी हवी असल्यास न्या. शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर जावे’, असे सुचवून खंडपीठाने त्यांची विनंती स्वीकारली होती.

आर्यन खानकडे त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते; एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here