रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळील भोस्ते घाटात आज, बुधवारी दुपारी दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम सध्या ठिकठिकाणी सुरू आहे. खेडमधील भोस्ते घाटातही रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणात अडथळा असलेला डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला. त्यामुळे माती आणि दगडांचा ढिगारा थेट महामार्गावर आला. त्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. महामार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

सून नव्हे मुलगीच! सूनेला किडनी दान करून ६२ वर्षीय सासऱ्याने दिले जीवनदान

रशिया-युक्रेन युद्धामुळे नाशिकमधील द्राक्ष बागायतदार हवालदिल का झाले?

सुरुंग स्फोटामुळे दरड कोसळून थेट रस्त्यावर

भोस्ते घाटात सध्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास या घाटात असणारा डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला. सुरुंगाच्या स्फोटामुळे डोंगर फुटून मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. हा ढिगारा बाजूला करण्याचे काम कल्याण टोल वेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हा ढिगारा हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या काही ढिगारा हटवण्यात आला असून, महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वारंवार घडताहेत घटना

कोकणातील हा महत्वाचा मार्ग आहे. असं असतानाही गेली अनेक वर्षे या महामार्गाचे काम सुरू आहे. अनेकदा हा मार्ग बंद पडून वाहतूक ठप्प झाली आहे. यापूर्वी पावसाळ्यात दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. पण आता उन्हाळ्यातही अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या महामार्गाची काय अवस्था होईल? असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच महामार्गाचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा जेसीबीवर कोसळला होता. यात जेसीबी चालकाचा मृत्यू झाला होता. तर, काही दिवसांपूर्वी या महामार्गाचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून रास्ता-रोको करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

पाणी जरा जपून वापरा! मुंबईत १५ टक्के कपात; ठाण्यात अपुरा पाणीपुरवठा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here