मुंबई: ‘आई कुठे काय करते‘ ही मालिका दिवसेंदिवस एक रोमांचक वळण घेत आहे. ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि खूप कमी काळात एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. या मालिकेची सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चा सुरू असते. पण अनेकदा मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं आहे.

प्रेक्षक आणि नेटकरी मालिकेतील चांगल्या गोष्टींचं कौतुकही करतात. पण काहीच्या चुकीच्या गोष्टी असतील तर त्यावरही आपलं मत व्यक्त करतात. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेबद्दल प्रेक्षकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेची तुलना नेटकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या निरोप घेतलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ शी केली आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. दोन्ही मालिकांची कथा एकाच ट्रॅकवर सुरू असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. वेगळं काही नाही, जे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तेच पाहायला मिळतंय, असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीए.

photo

‘आई कुठे काय करते या मालिकेची नायिका अर्थात अरुंधती देशमुख चा संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. मालिका सुरू झाली तेव्हा अरुंधती गृहिणी दाखवण्यात आली होती. पण तिच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगामुळं ती कणखर होऊन स्वत:च्या पायावर उभं राहत आहे. असंच काही कथानक माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचंही होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here