मुंबई : बिझनेस क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सगळ्यात मोठी पेमेंट्स स्टार्ट-अप (startup) कंपनी ‘भारतपे‘ने (BharatPe) सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांना सर्व पदावरून काढून टाकलं असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या कथित गैरवर्तनामुळे कंपनीने त्यांना सर्व पदावरून हटवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कंपनी अश्नीर ग्रोव्हर यांचे काही शेअर (shareholding) परत घेण्यापासून ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. खरंतर, शार्क टँक इंडिया या शोमधून अश्नीर ग्रोव्हर हे चांगलेच प्रसिद्ध झाले होते.

दुकानदारांना QR कोडद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा देणाऱ्या BharatPe ने बुधवारी एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, आगामी बोर्ड बैठकीचा अजेंडा मिळाल्यानंतर मंगळवारी ग्रोव्हर यांनी राजीनामा दिला. मंगळवारी संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत स्टार्टअपच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर, कंपनीने जारी केलेल्या निवेदनात, ग्रोव्हर यांना सर्व पदावरून काढून टाकल्याची माहिती देण्यात आली.

Gold-Silver Price Today: सोने दरात मोठी वाढ; कमाॅडिटी बाजारात गाठला नवा टप्पा, जाणून घ्या आजचा दर
अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर अनियमिततेचा आरोप

भारतपे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. “ग्रोव्हर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे. इतकंच नाहीतर, खोटे आणि बनावट विक्रेते आणून त्यांनी कंपनीच्या खात्यातून पैसे वळवले. कंपनीच्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आला. या सगळ्या आरोपांनंतर ग्रोव्हर यांनी मंगळवारी राजीनामा दिला.

ग्रोव्हर यांनी बोर्डाच्या मान्यतेशिवायच राजीनामा दिला असून कंपनीला त्याच्या १.४ टक्क्यांपर्यंतचा शेअर्सचा हिस्सा काढण्याचा अधिकार आहे. तर त्यांच्याकडे सध्या BharatPe मध्ये ९.५ टक्के हिस्सा आहे. भारतपे कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात ग्रोव्हर कुटुंब आणि नातेवाईकांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

प्रमुख निर्देशांक समकक्ष या शेअरची कामगिरी, सत्रतळातून व्यवहाराखेर घेतली मूल्यउभारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here