बारामतीत भाजप कार्यकर्ते थेट अजित पवारांच्या घरासमोर जाऊन धडकले! – bjp’s agitation against the state government in front of the residence of ncp leader and deputy chief minister ajit pawar in baramati
बारामती : भाजपने विविध मुद्द्यांवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बारामतीतील भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून बुधवारी या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोरच आंदोलन केलं. (Ajit Pawar Baramathi Home)
वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी बारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. ;cm criticizes bjp: ‘आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते आता वळवळतंय’; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर वार
वीज बिले भरली नसल्याने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याविरोधात बुधवारी राज्यभर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आलं. बारामतीतही अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर राज्य सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन करत वीज बिले माफ करण्याची मागणी केली.
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन वीज पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा भाजपच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशारा भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी दिला आहे.