मृत्यू झालेला २५ वर्षीय तरुणाचे ४५ वर्षीय महिलेसोबत एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. तरुणाने आपल्यासोबत लग्न करावं यासाठी महिलेने त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने महिलेच्या घरातच आत्महत्या केली. ही आत्महत्या लपवण्यासाठी महिलेने आपला २० वर्षीय मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा मृतदेह महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला. मात्र पोलीस तपासात हा बनाव उघड झाला.
याप्रकरणी ४५ वर्षीय महिला आणि तिच्या मुलासह आणखी एका आरोपीवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना आला होता संशय
या अपघाताची नोंद करत असतानाच पोलिसांना याबाबत संशय होता. आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घालून अधिकचा तपास सुरू केला होता. पोलिसांचा हाच संशय खरा ठरला आणि सदर घटना ही अपघात नसून आत्महत्या असल्याचं तपासात समोर आलं आहे.