राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. महाविकासआघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आज अभिभाषणात काय बोलणार, हेदेखील पाहावे लागेल.

 

Maharashtra Assembly (1)

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन

हायलाइट्स:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात
  • अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. महाविकासआघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आज अभिभाषणात काय बोलणार, हेदेखील पाहावे लागेल. (Maharashtra assembly session 2022)
मुख्यमंत्र्यांचेही मलिक यांना ठाम समर्थन; आमदारांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे सदस्य पहिल्याच दिवसापासून आक्रमक होणार आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकासआघाडीनेही व्युहरचना केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी महाविकासआघाडीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या दबावाला अजिबात बळी न पडण्याचा सल्ला उपस्थित आमदारांना दिला. ‘विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांची प्रकरणे सरकारकडे आली आहेत. त्याबाबत चौकशीही पूर्ण झाली आहे. लवकरच अशा नेत्यांवर कारवाई झालेली तुम्हाला दिसेल’, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आज अधिवेशनात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Devendra Fadnavis: तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला इशारा
Live Updates:

* भाजप नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार
* शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला

* सकाळी ११ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण

* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार

* विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत तोडगा निघण्याची शक्यता

* करोना काळानंतर पहिल्यांदाच संपूर्ण कालावधीचे अधिवेशन

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra budget session 2022 live updates governor bhagat singh koshyari addresses joint session of assembly cm uddhav thackeray devendra fadnavis nawab malik resignation mahavikas agadhi govt bjp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here