विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन काही विषयांवर भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे दिशाभूल करणारे वक्तव्य केले त्याचा साधा निषेधही देवेंद्र फड़णवीस यांनी करू नये ?

 

Raut Fadnavis

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • भाजपने दाऊदच्या नावाने भुई धोपटायचा प्रकार थांबवावा
  • दाऊदला भारतात आणून फासावर लटकवण्याची जबाबदारी मोदी सरकारची आहे
मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल, हे अधिवेशन गाजेल, अशी हूल भाजपकडून दिली जात आहे. मात्र, त्यामध्ये फारसे तथ्य नाही. १०५ चा आकडा असूनही सत्ता गमवली, हे शल्य भाजपच्या मनात असून ‘आता माझी सटकली’ याच मानसिकतेने भाजप काम करत आहेत. त्यामुळे आगामी अधिवेशनात भाजप सभागृहात गोंधळ घालणार असेल तर त्यास वादळ म्हणता येणार नाही. फार फारतर त्यास आदळआपट म्हणावे लागेल, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून लगावण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन काही विषयांवर भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे दिशाभूल करणारे वक्तव्य केले त्याचा साधा निषेधही देवेंद्र फड़णवीस यांनी करू नये ? खरे तर असे अनेक विषय वादळी आहेत व त्यावर विधिमंडळात चर्चा होणे गरजेचे आहे, असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचेही मलिक यांना ठाम समर्थन; आमदारांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
तसेच भाजपने दाऊदच्या नावाने भुई धोपटायचा प्रकार थांबवावा. नवाब मलिक यांनी दाऊदशी आर्थिक व्यवहार केले म्हणून ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आग्रह आहे. दाऊद इब्राहिम हा भारताचा दुश्मन आहे. त्याला भारतात आणून फासावर लटकवण्याची जबाबदारी मोदी सरकारची आहे. त्यामुळे मोदी सरकारने कराचीत एकदाचा सर्जिकल स्ट्राईक करून दाऊदचा खात्मा करावा. दाऊदच्या नावाने काठ्या आपटण्याचा प्रकार कधीतरी थांबलाच पाहिजे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
;cm criticizes bjp: ‘आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते आता वळवळतंय’; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर वार
‘समीर वानखेडे हे भाजपचे दत्तक पुत्र’

शिवसेनेने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरूनही भाजपला लक्ष्य केले आहे. एनसीबीचे समीर वानखेडे हे भाजपचे दत्तक पुत्र आहेत. त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या खोट्या प्रकरणांचा भांडाफोड नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे नवाब मलिक यांना आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. अनिल देशमुख आज तुरुंगात आहेत. पण सर्व गुन्ह्यांचे मुख्य सूत्रधार परमबीर सिंह यांना दिलाशामागून दिलासे फक्त भाजपकृपेनेच मिळत आहेत. एनसीबी आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रातील वाढता हस्तक्षेप हा विधिमंडळातील चर्चेचा विषय आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात जोरकस उत्तर देणे अपेक्षित आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena take a dig at bjp over devendra fadnavis waring about maharashtra budget session 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here