nawab malik: Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी आणखी वाढणार; मुंबईत बीकेसीत २०० कोटींचा भूखंड असल्याची माहिती – ed found land of worth 200 crore in bkc mumbai of nawab malik family
रिपोर्ट्सनुसार, हा भूखंड २००६ साली खरेदी करण्यात आला होता. त्याच्या पैशांची देवाणघेवाण तीन वेळा वेगवेगळ्या खरेदीदारांच्या माध्यमातून झाली होती. ईडीकडून पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित व्यक्तींकडेही चौकशी करण्यात येत आहे. टचवुड रिअल इस्टेट कंपनीने अन्य एका कंपनीसोबत १२.७ कोटी रुपयांचे ट्रान्जेक्शन केलेले आहे, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे समजते. आता ही कंपनी ईडीच्या रडारवर असून, त्या दिशेने तपास सुरू आहे, असे सूत्रांकडून कळते.
मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक अटकेत
ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ३ मार्चपर्यंत ते ईडी कोठडीत आहेत. त्यांची ईडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येईल. त्याआधी ईडी कोठडीत असताना मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २८ फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले.