मुंबई: महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी भाजप आणि राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षांचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरच राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची आज, गुरुवारपासून झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे नेते आक्रमक झाले होते. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षांचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण काही मिनिटांतच आटोपून सभागृहातून निघून गेले. राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच ते सभागृहातून निघून गेल्याने सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप करत, निषेध नोंदवला. विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करून राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
राज्यपालांनी शिवाजी महाराजांचं नाव उच्चारताच सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी; एका मिनिटात भाषण आटोपलं

कुख्यात गुंड आणि मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिमचे बॅनर भाजपच्या आमदारांनी विधीमंडळात झळकावले. हीन राजकारणासाठी एका दहशतवाद्याचा फोटो विधीमंडळासारख्या पवित्र ठिकाणी झळकावण्याऱ्या भाजपचा निषेध करतो, असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिली. दरम्यान, शीर्षासन करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या आमदार संजय दौंड यांनीही अशा प्रकारे निषेध का नोंदवला, याचे कारण सांगितलं. विधीमंडळाच्या सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण होते. पण राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण केले नाही. राज्यपाल हे राज्याची भूमिका मांडत असतात. महाविकास आघाडी सरकारने राज्यात चांगले काम केले आहे. ते विरोधकांना ऐकायचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून राज्यपालांनी त्यांचा अवमान केला आहे. हा राज्याचा अपमान आहे. त्यांचा मी धिक्कार करतो. त्यांच्या या कृतीचा निषेध म्हणून मी शीर्षासन केले, असे दौंड यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस म्हणाले, बाळासाहेब असते तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here